कोरोना व्हायरसच्या महासाथीबद्दल काही – नर्मदा खरे
आम्ही ऐकलंय की जीवाणू सगळीकडे असतात: शरीरात, हवेत, पाण्यात. मग कोरोना व्हायरसही सगळीकडेच असणार, नाही का? पहिले तर, कोरोना हा विषाणू (virus) आहे, जीवाणू (bacteria) नाही. जीवाणू हे एकपेशीय, सूक्ष्मदर्शी जीव आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे असून पृथ्वीतलावर जवळजवळ सगळीकडे (गरम झरे, खारट पाणी, अत्यंत थंड किंवा गरम प्रदेश) सापडतात. काही जीवाणू माणसाच्या शरीरावर किंवा शरीराच्या …